जिल्हा परिषद प्रशालेत दप्तर वाटप व मार्गदर्शन सोहळा संपन्न



पालम (विनोद कांबळे)- जिल्हा परिषद प्रशालेत आज शनिवारी 'शास्त्रज्ञ आपल्या भेटीला' या विशेष उपक्रमांतर्गत निवृत्त DRDO वैज्ञानिक डॉ. किशनराव सिरस्कर यांच्या उपस्थितीत दप्तर वाटप आणि पालक सभा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.आपल्या मार्गदर्शनात डॉ. किशनराव सिरस्कर यांनी त्यांच्या DRDO मधील अनुभवांना उजाळा दिला. "केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला शिकावे आणि विज्ञानाची कास धरावी," असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. एका शास्त्रज्ञाला प्रत्यक्ष समोर पाहून आणि त्यांचे अनुभव ऐकून विद्यार्थी भारावून गेले होते. सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक दगडोपंत(अण्णा) शिंदे उपस्थित होते. शालेय दप्तराचे वाटप किशनराव सिरस्कर यांच्यावतीने करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा दोन्ही शाळेतील संपूर्ण स्टाफ, मुख्याध्यापक,शिक्षणप्रेमी नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.