कै.किशनराव पुरभाजी कांबळे यांच्या स्मृती पित्यार्थ सर्व रोग निदान शिबिर संपन्न
परभणी :- मानव विकास प्रकल्प व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कै किशनराव पुरभाजी कांबळे यांच्या तृतीय स्मृती पित्यार्थ रविवार 18 जानेवारी 2026 रोजी सर्व रोग निदान व उपचार शिबीर राणी सावरगाव येथे घेण्यात आले . या शिबीराचे उदघाटन सरपंच श्रीमती बबीता ज्ञानोबा माऊली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिराचे अध्यक्ष डॉ. पि. डी. जोशी पाटोदेकर त्वचारोग तज्ञ यावेळी बोलताना त्यांनी माता बाल संगोपन व बदलती जिवन शैली व नियमित आरोग्य तपासणीचे महत्व विषद केले . प्रमूख पाहुणे ह डॉ पि एम साळवे जनरल सर्जन यांनी आजारीच पडून नही म्हणून मार्गदर्शन केले . श्रीमती डॉ एस पी साळवे मॅडम (स्त्री रोग तज्ञ ) यांनी स्त्रीयांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले डॉ युएस वानखेडे (बालरोग तज्ञा यांना बालकांच्या सर्वांगीन विकासाचे मार्गदर्शन केले डॉ.राठोड (कॉन्सर तज्ञ) यांनी कॉन्सर आजरा विषयी जन जागृती केली . तज्ञ डॉक्टरांकडून मोफत औषधाचे वाटपही करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती प्रा कांबळे बी के यांनी केले . प्रास्ताविक श्रीमती कांबळे एम . सी . यांनी केले . आभारप्रदर्शन सि के कांबळे यांनी केले . या प्रसंगी स्वंयसेवक आर पवार श्रीमती एस एस चलोदे , श्रीमती एल एम गायकवाड, श्रीमती एस व्ही चाटे, श्रीमती डी.बी मक्कापल्ले श्रीमती ए बी जाधव ,श्रीमती पी सोनकांबळे श्रीमती के एस वाघमारे व ग्रामपंचायत सदस्य राम नरवड, पंढरी राठोड तसेच सामाजीक कार्यकर्ते एस नागरगोजे स्वयंसेवक भिमराव कांळे, डि जाधव , आर उफाडे उपस्थित होते
ग्रामीण भागातील नागीरकंमध्ये आरोग्यप्रती जागरूकता निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थाना व्यक्त केली .

0 Comments