हिवाळी 2026 परीक्षा यशस्वी रित्या सुरु.
नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्र व पुनर्परीक्षा दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या यशस्वी व पारदर्शक आयोजनासाठी विद्यापीठाकडून विविध केंद्रांवर वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी विभागीय केंद्र, नांदेड येथे वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक उपस्थित होते. नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार कलेपवार सर यांनी परीक्षेचे नियम, जबाबदाऱ्या, शिस्त व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. दिग्विजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत परीक्षेच्या पारदर्शक व शिस्तबद्ध अंमलबजावणीवर भर दिला.
या बैठकीस विभागीय केंद्र नांदेड येथील दिलीप थोरात, राजू खरपडे, विकास पावडे व नितेश देशमाने यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमुळे वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांना परीक्षासंदर्भातील मार्गदर्शक सूचना स्पष्ट झाल्या असून आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

0 Comments