भारतीय बौद्ध महासभेच्या महानगर अध्यक्ष पदी भारत देवरे यांची निवड


परभणी - भारतीय बौद्ध महासभा महानगर शाखा परभणीच्या कार्यकारीणीची निवड जिल्हा अध्यक्ष इंजि. एम एम भरणे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.ही बैठक राहुल नगर येथील समाजमंदिर येथे पार पडली.कार्यकारणी पुढीलप्रमाणे महानगराध्यक्ष -भारत देवरे,सरचिटणीस - धुराजी रामराव मगरे ,कोषाध्यक्ष -उत्तम रुख्माजी शिवभगत,उपाध्यक्ष संस्कार -एस एस साळवे ,उपाध्यक्ष प्रचार,पर्यटन- एम एम बरे,सचिव संरक्षण -दगडू भीमा भालेराव, संघटक -बापुराव श्रीरंग मोरे, संघटक-उत्तम धोंडीबा रणवीर ,संघटक-भुषण प्रकाश सोनकांबळे ,संघटक-वसंत सोनाजी भोळे ,ही कार्यकारिणी निवडण्यात येऊन उर्वरीत पदे लवकरात लवकर भरुन अहवाल सादर करण्याच्या सूचना नवनिर्वाचित अध्यक्षांना देण्यात आल्या.आभार प्रदर्शन व शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.