शिवनेरी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
पालम - शिवनेरी कनिष्ठ महाविद्यालय पालम येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक ३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. एस.व्ही.शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम , प्राचार्य प्रा. आर.सी घोगरे
, शिवनेरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी.आर. तोंडारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. तद्नंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर.सी घोगरे यांनी, सुत्रसंचलन प्रा. एस.एम. वाघमारे तर आभार प्रा. आर. ई . गायकवाड यांनी मानले . या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

0 Comments