वादळामुळे सोलार पंपाचे नुकसान - शेतकरी चिंतेत 




परभणी : जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक मधुकर वैजे यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या गट नं. 274 मधील शेतात बसविलेला सोलार पंप व 3 एचपी मोटार वादळामुळे पूर्णपणे निकामी झाली आहे. 6 सोलार प्लेटस तुटून पडल्या असून, अँगल, वायर आदी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची एकूण किंमत अंदाजे  80 ते 90  हजार रुपये असल्याची माहिती आहे. हे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असुन सरकारकडून मदतीची अशा आहे.