नाशिक येथील 'उदबोधन कृती सत्रात' 'CMS' मधील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान
नांदेड (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक येथे आयोजित 'उदबोधन कृती सत्र' कार्यशाळेत नांदेड विभागाचे प्रशासकीय संयोजक श्री. नितेश देशमाने यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. 'CMS' (Counselor Management System) मध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथे १० मार्च रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सर , प्र. कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे सर , विभागीय संचालक डॉ. कलेपवार सर आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक श्री. प्रकाश देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्री. देशमाने यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्र संयोजक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, नांदेड विभागातील श्री. विकास पावडे आणि श्री. माधव गिरे, दिलीप थोरात यांचीही याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
श्री. नितेश देशमाने यांच्या या यशामुळे नांदेड विभागीय केंद्राचे आणि अभ्यास केंद्राचे नाव उंचावले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments