पेठ पिंपळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी




 प्रतिनिधी (विनोद कांबळे)- आज दि 29 एप्रिल 2026 रोजी मौजे पेठ पिंपळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजाचे व निळ्या ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सामूहिक त्रिशरन  पंचशील ग्रहण उपासक  पंढरी  कांबळे यांनी दिले.यानंतर आदर्श शिक्षक सतीश जाधव सर यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक मांडले. या नंतर गावातील लहान मुलांनी मुलींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . संयुक्त जयंतीनीमीत्त भव्य निबंध स्पर्धा घेण्यात आली होती याचे बक्षीस वितरण ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी ही मार्गदर्शन केले यात  पालम तालुक्यातील पत्रकार चांदभाई तांबोळी यांनी संविधान आपल्यासाठी किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी सांगितलेला धम्म कसा स्वीकारला पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन मा. निवृत्ती हातीअंबिरे RPI जिल्हाध्यक्ष परभणी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक गोविंद कोपनर सर यांनी सखोल मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा धम्म ,अंधश्रद्धा ,शिक्षण , कर्मकांड अश्या विविध प्रकारच्या घडामोडीवर प्रकाश टाकला प्रा. कोपनर सर यांनी पुढे बोलताना सांगितलं की माता रमाईने किती कष्टाने बाबासाहेबांना साथ दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एड. विजयकुमार शिंदे ( माजी सभापती पंचायत समिती पालम ) तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच काशिनाथ शिंदे, सरपंच परशुराम मोकनपल्ले पंचायत समितीचे सदस्य महादेव सकत , RPI चे जिल्हाध्यक्ष निवृत्ती हातीअंबिरे, मा. गणेश भाऊ हत्तीअंबिरे ( संचालक कृ उ बा स पालम तथा सदस्य सं गांधी निराधार योजना पालम) जालिंदर अंकल हत्तीअंबिरे ( मा नगराध्यक्ष पालम) गावचे पोलीस पाटील नितीन उकंडे, प्रा गजानन हुलगिर, उत्तमराव शिंदे अशोकराव शिंदे, विजयकुमार गाणार, संतोष सकत, निवृत्ती वाघमारे,आकाश हतिअंबीरे,तसेच मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका गावातील मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद कांबळे सर यांनी केले.दुपारच्या सत्रात गावातील मुख्य रस्त्याने महामानवाच्या तेल चित्राची भव्य दिव्य अशी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली यात हजारो अनुयायांनी सहभाग घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळ, बौद्ध उपासक उपसीका यांनी  परिश्रम घेतले.