दिशा दैवशाला आडे हिचे वैद्यकीय क्षेत्रात यश; 'घाटी रुग्णालयातून मिळवली एमबीबीएस पदवी .




परभणी (विनोद कांबळे):  दिशा दैवशाला आडे (राठोड) हिने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे. दिशा ने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी हॉस्पिटल) येथून आपली एमबीबीएस (MBBS) पदवी प्रथम श्रेणीत यशस्वीरित्यापूर्ण केली आहे.

दिशाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिद्दीने पूर्ण केल्यानंतर तिने वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे आज फळ मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित 'घाटी' रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तिने अहमदपूर शहराच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तिच्या या यशाबद्दल अहमदपूर ,पालम  परिसरातून व आडे (राठोड) परिवाराकडून तिचे कौतुक होत आहे. एका ग्रामीण भागातील मुलीने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षेत यश मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दिशाने आपल्या यशाचे श्रेय आई दैवशाला रामराव राठोड ,मामा , माऊशी, नाना नानी गुरुजन आणि मार्गदर्शकांना दिले आहे. भविष्यात जनसेवा करण्याचा मानस तिने यावेळी व्यक्त केला आहे .

तिच्या या यशाबद्दल  जय भवानी माध्यमिक शाळा मोजमाबाद येथील प्राचार्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रमंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.