शिवनेरी कनिष्ठ महाविद्यालयाचा विनायक पांडुरंग कदम हा विद्यार्थी 90.33 % गुण घेत विज्ञान शाखेतुन तालुक्यातून पहिला 



प्रतिनिधी (पालम) - नुकताच १२ वी बोर्डाचा निकाल लागला असून यावर्षी ही शिवनेरी कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% , कला शाखेचा निकाल ७४% व वाणिज्य शाखेचा निकाल ७६% लागला असून ही निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. पालम तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी हा शिवनेरीचा असून ११ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर ५६ विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस.व्ही.शेटे सर , सचिव वैभव भैय्या शेटे सर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी.आर. तोंडारे सर , सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. पुढेही असाच निकाल व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहु अशा भावना प्राचार्यानी यावेळी व्यक्त केल्या.