व्हाइस ऑफ मिडियाच्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ तर उपाध्यक्षपदी चांद तांबोळी
पालम (प्रतिनिधी):- जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉटेल शुक्लेश्वर येथे नूतन कार्यकारिणी जाहीर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीचा निर्धार पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या 'व्हॉइस ऑफ मीडिया' या देशव्यापी संघटनेच्या पालम तालुका कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये सर्वांच्या एकमताने तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ तर उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. पालम शहरातील हॉटेल शुक्लेश्वर येथे आयोजित एका विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
आद्य पत्रकारांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर 'व्हॉइस ऑफ मीडिया'चे परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पालम तालुक्याची नवीन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली. पत्रकारांचे संघटन मजबूत करणे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले.
'व्हॉइस ऑफ मीडिया'ची पालम तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
नवनिर्वाचित कार्यकारिणीत तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना सामावून घेण्यात आले असून जाहीर झालेली संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे.
तालुका अध्यक्ष: गुणवंत सराफ (दै. सामना),तालुका उपाध्यक्ष: चांद तांबोळी (दै. एकजूट),कार्याध्यक्ष:सुनिल कवटकवार नाव्हकर ( सारथी महाराष्ट्राचा ),सचिव:बालासाहेब फुलपगार (दै. अक्षराज ),कोषाध्यक्ष: केरबाजी बहिरवाड (दै. लोकमत),संघटक:अंकुश वाघमारे (दै. पुण्यनगरी),प्रसिद्धी प्रमुख: संपादक प्रा. विनोद कांबळे (सम्यक वर्तमानकाळ न्युज पेपर),सल्लागार:अंबादास ठाकूर ,कार्यवाहक: गोविंद सोलेवाड (दै. देशोन्नती),सदस्य: शेषराव सोपणे, रावसाहेब वावळे, गणेश काकडे ,मार्गदर्शक: रुक्माजी गिनगिने (दै. लोकमत), संग्राम खेडकर लक्ष्मण दुधाटे, मोतीराम शिंदे.या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, ग्रामीण अध्यक्ष काळे यांच्या नियुक्ती पत्र देण्यात आले तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि पत्रकार बांधवांकडून मोठे स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
-

0 Comments