कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
परभणी (गणेश घनसावंत ) - कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात कै. सौ. कमलताई जामकर यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट महिला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात संपन्न झाला.
जयंतीच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲड.किरणराव सुभेदार (उपाध्यक्ष, नू.वि.म.शि. संस्था,परभणी) हे होते. तर प्रमुख उपस्थितीत श्री. हेमंतराव जामकर(अध्यक्ष, नू.वि.म.शि. संस्था,परभणी), डॉ. अभयराव सुभेदार(कोषाध्यक्ष),
श्री. विजयराव जामकर(सचिव,) डॉ. संजयराव टाकळकर(सहसचिव), ॲड. मंगेशराव सुभेदार(संचालक), मा. गोविंदराव नादांपूरकर (संचालक), सौ. दीपलक्ष्मीताई जामकर(संचालक)सौ. सोनियाताई जामकर, हर्षल सुभेदार, प्राचार्य डॉॅ.रामचंद्र भिसे, प्राचार्य मनोहर पुरी, मुख्याध्यापक जी.एन. शिंदे, कच्छवे , सौ. कविता उंडाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षिकांमधून यावर्षीचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार सौ. माधवी देशपांडे, सौ. छाया बुलबुले यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अनुजा पंडित यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार कु. संस्कृती पद्मवार, जयश्री भालेराव, लावण्या रुघे, नव्या राष्ट्रकूट यांना देण्यात आला. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व रोख रक्कम देण्यात आली. कमलताईंच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य चित्र प्रदर्शन आयोजित केलेले होते. तसेच राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्र व बी. व्होक फॅशन टेक्नॉलॉजी व ब्युटीफिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीनिमित्त शिवणकाम व ब्युटीपार्लर कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. त्यांनी तयार केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन आयोजित केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. संगीत विभागातील प्रा. डॉ. रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर पाथरकर व विद्यार्थिनींनी कमलगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले. याप्रसंगी कमलताईं बद्दलच्या भावना मा. श्री विजयराव जामकर यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आशा गिरी यांनी केले व आभार डॉ. पल्लवी कुलकर्णी यांनी मानले.

0 Comments