शिवनेरी महाविद्यालय पालम येथे मोठ्या हर्षोल्लासात शिक्षक दिन साजरा



पालम दि. 5 सप्टेंबर रोजी शिवनेरी महाविद्यालय पालम येथे शिक्षक दिनाचे अवचित्त साधून  विद्यार्थांकडून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून शिक्षकांचा यथोच्छ संम्मान केला. या वेळी कार्यकमाचे अध्यक्ष शिवनेरी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. तोंडारे सर होते. तर प्रमुख उपस्थीत प्रा. आर. ई. गायकवाड सर होते . या प्रसगी प्रा.  ए.डी. शेटे सर प्रा. विकास आसले सर प्रा. शिवकण्या स्वामी मॅडम व श्री कांबळे सर , श्री. कृष्णा नाईकवाडे सर यांची व्यासपीठावर ऊपस्थिती होती.

  माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमेची पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला वैष्णवी वंजारे व वैष्णवी घोगरे या BCS FY च्या विद्यार्थींनीनी स्वागत गीत गायले. तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक रूपाली जाधव BCS SYच्या वीद्यार्थींनीनी केले. यानंतर  मनोगत महेश डांगे BCA SY,  गायत्री खेडकर BCSFY  , वर्षा पवार BCS FY, आनम शेख BCS FY, रूपाली जाधव BCSSY, मसीरा सय्यद BCS FY, शेख आनम BCS SY पवार नागेश BCS FY. , यांनी आपले मनोगत व्यक्त केले . शिक्षकांनी केलेले विद्या दान हे आम्ही कधी विसरणार नाहीत ही ग्वाही देत विद्यार्थी शिक्षक दिनानीमीत्त विद्यालयातील वातावरणाशी एकरूप झाले होते 

यानंतर प्रा. विकास आसले सर, प्रा. स्वामी मॅडम , प्रा. ए डी. शेटे  सर व  प्रा. गायकवाड आर . ई. यांनी आपले विचार व्यक्त करत विद्यार्थांचा सर्वांगिन विकास व त्याना विद्यादानात कुठलीही कसर बाकी ठेवणार नाहीत हा विश्वास देत सर्व शिक्षक बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य तोंडारे सर यांनी विस्तृत विचार मांडत डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरप्रकाश टाकला.  यानंतर आभार प्रदर्शन प्रवीन जमदाडे BCS FY याने केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन करत कार्यक्रमात एक चांगला रंग व उत्साह  रितेश वरपडे BCA SY  च्या विद्यार्थानी  भरला   व शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली